लोहारा/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची सर्वानुमते नुकतीच  निवड झाली आहे. उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते नुतन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन  काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला (लोहारा), तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top