उमरगा (संवाददाता)
उमरगा तालुक्यात महिला बचतगटाची चळवळ सक्रीय झाली असून अडीच हजार बचत गटाच्या माध्यमातून  पंचेवीस हजार महिला सक्रीय झाल्या आहेत.बचत गटाच्या महिलानी तालुक्यातील 96 गावात विविध उद्योग व्यावसाय सुरू केल्याने गावागावात आर्थिक क्रक्रांती सुरू झाली आहे . महिलांच्या बचतगटा मुळे पंचेवीस हजार संसार फुलले आहेत, असे प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयाच्या वतीने बचतगट महिला स्वयंरोजगार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उट्घाटन प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेदचे विवेकानंद पवार, बाबासाहेब नाईक, मनोज कवडे , प्राचार्य श्रीराम पेटकर , प्राचार्य डॉ. विजयकुमार सरपे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात महिलांना विविध उद्योग व्यावसायांचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यानी या वेळी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले .डॉ. गरूड म्हणाले की, महिलाना निसर्गताच आर्थिक बचतीचे कौशल्य प्राप्त झाले आहे . महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत उमरगा तालुक्यात महिला बचत गटाची आर्थिक चळवळ गतीमान झाली आहे . महिलानी पैशांचा उपयोग योग्य प्रकारे केल्यामुळे पंचेवीस हजार संसार फुलण्यास हातभार लागला आहे . ग्रामीण भागातील सर्वांगीण आर्थिक विकासा करीता महिलां बचत गटांचे संघटन प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ. गरूड म्हणाले . उस्मानाबाद येथील शिवाजी राऊत , युवराज शिंदे , गणेश गवळी , अनिल नागणे , सुहास पारणे ,यानी शाश्वत उपजिविका , ध्यानधारणा , योग प्राणायम , शेळी पालन , कुकुटपालन , या विविध विषयाचे मार्गदर्शन केले .
कृषि अधिकारी सारीका अंबुरे यांचे मार्गदर्शन झाले . अंबुरे म्हणाल्या की, जीवनात सकारात्मक मानसिकता ठेवणे महत्वाचे आहे . प्रत्येकाच्या जीवनात संधी मिळत असते मिळालेल्या संधीचं सोनं अवश्य करा . महिलानी कधिही न्यूनगंड बाळगू नये . संयम हा यशाचा पाया आहे . जीवनातील यशाकडे संयमाने पहा ! अंधश्रध्दा , अनिष्ठ चालीरीती , हुंडाबंदी या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घ्या. शेतकरी कुटूंबातील उपवर मुलांमुलींच्या विवाह कार्यासाठी पुढाकार घ्या असे अवाहन त्यानी केले . या वेळी चर्चा सत्र, परिसंवाद घेण्यात आला. कमल कुंभार ,सुचेता कोळगे , बाबासाहेब नाईक , विवेकानंद पवार ,यानी उपस्थित महिलांना विविध उद्योग व्यावसायाच्या यशस्वीतेचे महत्व विषद केले .उपस्थित महिलानी बचत गटांच्या यश प्राप्तीची माहीती दिली .प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या वेळी पाटील म्हणाले की, महिलांच्या संयमी वृत्तीमुळेच सामाजिक , आर्थिक , व कौटुंबिक विकास होण्यास मदत झाली आहे . सर्वच क्षेत्रात महिलानी आपली भरारी घेतली आहे. महीलाना सहन शक्तीचे दैवी दान लाभल्यामुळे शेतकरी महिला कधिच आत्महत्या करीत नाहीत. ग्रामीण भागातील महिला मुलीनी शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे . बदलत्या काळाप्रमाणे महिलानी अधुनिक तंत्रज्ञान अवगत करून आपला व्यक्तीमत्व विकास साधावा असे अवाहन पाटील यानी केले . तालुक्यात उभारण्यात आलेल्या महिला बचत गटामुळे विविध लघु उद्योग व्यावसायाला चालना मिळाली आहे . पंचेवीस हजाराहून अधिक संसाराला सन्मामाने जगण्याचा अधार मिळाला आहे. प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यानी केले .सुत्रसंचलन प्रा .डॉ.आप्पाराव गायकवाड यानी केले.आभार प्रा.डॉ. फुलचंद पवार यानी मानले. प्रशिक्षण शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाल
 
Top