उस्मानाबाद/प्रतिनिधी-
दलित वस्ती सुधार योजनेच्या ९ कोटी ३५ लाख रूपयाचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी प्रशासनाला जाग आली असून, तातडीने त्यंानी नगर परिषद व नगर पंचायतींना साहित्य पुरवठा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिका-यांनी गांर्भीयाने दखल घेऊन करण्यात येणारा साहित्य पुरवठा थांबवून संबंधीतावर त्वरीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हा नियोजन वार्षीक योजनेत सन २०१८-१९ व  २०१९-२० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास शाखेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत ९ कोटी ३५ लाख रूपये न.प.ला देण्यासाठी दिले असता त्यांनी परस्परच भ्रष्टाचार केला. उस्मानाबाद जिल्हयातील नगर परिषद व नगर पंचायतीकडून प्रस्ताव न मागविता व निधी न देता अंदाजपत्रकारांना तांत्रीक मान्यता न घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास खाते ने कोणताही अधिकार नसताना नियमबाह्य प्रक्रियेने निवदा प्रक्रिया केली. विशेष म्हणजे कसल्याही साहित्याचा पुरवठा न करता पैसे मात्र, वाटप करण्यात आले. अॅक्सिस बॅंकेतील करंट व चालू खाते असताना इक्वीटास बॅंकेत बचत खाते काढून रक्कम व रक्कमेचा अपहार केला. या प्रकरणाची चौकशी याच कार्यालयातील अधिका-यांची नेमणुक करून भ्रष्टाचार लपविण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही आ. ठाकुर यांनी केला.विशेष म्हणजे भ्रष्ट्राचाराचे आरोप सुरू होताच साहित्याचे ट्रक पाठवून संबंधित न.प.ला साहित्य पुरवठा केला जात आहे.त्यामुळे हा साहित्याचा ट्रक कोणाच्या आदेशाने पाठविला. या प्रकरणात चौकशी होऊन पुरवठा व ठेकेदार व दोषींवर तात्काळ गुन्हा नोंद करावा,या प्रकरणातील निविदा, दस्तावेज, सर्व लेखे, अभिलेखे, कागजात यात पेरफार होऊ नये यासाठी सुरक्षित ठेवावे, या प्रकरणाची गुन्हे अन्वेशन विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
Top