श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतुने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 500 विद्यार्थ्यांना सध्या भारतभर गाजत असलेला  तानाजी - द अनसंग वॉरियर  हा ऐतिहासिक चित्रपट दाखवला. उस्मानाबादमधील श्री चित्रमंदीर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत हा खेळ  आयोजित केला होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांच्या मावळ्यांनी जिवाचं रानं केलं. आणि एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. त्यातीलच एक शूर वीर मावळा म्हणजे तानाजी मालुसरे.
तानाजी मालुसरे यांनी साथीदारांसह जीवाची बाजी लावून जिंकलेल्या कोंढाणा किल्ल्याची ही हकीकत आहे. विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहाने हा चित्रपट पाहिला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही चित्रपटाचा आनंद सुटला. तानाजी मालुसरे यांच्या या शौर्यगाथेने सर्वजण भारावूनच चित्रपटगृहातून बाहेर पडले.
यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,कला व विज्ञान शाखाप्रमुख प्रा.संतोष घार्गे, प्रा.नंदकुमार नन्नवरे, प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.रविंद्र माने, प्रा.विवेक कापसे, प्रा.आप्पासाहेब गुत्ते, प्रा.सुर्यकांत कापसे, प्रा.संतोष शेटे, प्रा.देवानंद साळुंके, प्रा.मोहन शिंदे, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.विश्वंभर सुर्यवंशी, प्रा. नासीर मोमीन, प्रा.राम लोमटे, प्रा.प्रशांत लोंढे, प्रा.विष्णू देशमुख, प्रा.अमित लोमटे,  प्रा.अनिता तुंगीकर, प्रा.मेघमाला देशमुख, प्रा.प्रगती वाघमारे, प्रा.दिपाली बंडगर, प्रा.लक्ष्मी भोसले, प्रा.सरोज साळुंके, प्रा.शुभांगी माने प्रा.शिवकन्या सुरवसे आदि शिक्षक उपस्थित होते.
 
Top