
हरभरा पिकावरील अळीच्या बंदोबस्तासाठी सेंद्रिय औषध फायदेशीर आहे अशी माहिती स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या कृषी संवाद सहाय्यक जयश्री माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्या दुषित वातावरणामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणुन अल्प दरामध्ये होणा-या सेंद्रीय औषधाची फवारणी केल्यास विषमुक्त पिकाचे उत्पन्न मिळु शकते. यासाठी हरभरा पिकांना घाटे लागन्यापूर्वी " अग्नी आस्ञ "औषधाची फवारणी करावी.अग्नी आस्ञ औषध एक एक्करासाठी एका भांड्यात दहा लिटर गाईचे गोमुञ, कडू लिंबाचा वोला पाला पाच किलो, हिरवी मिरची आर्धा किलो, लसुन पाव किलो, गावरान तंबाखू अर्धा किलो हे सर्व एकञीत करून अग्नीवर उकळावे ते उकळलेले मिश्रण 48तास थंड होण्यासाठी ठेवावे .त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण प्रत्येकी एक पंपासाठी पाण्यात 1 लिटर टाकून फवारणी करावी.
त्यानंतर हरभरा पिकाला घाटे आल्यावर "ब्रम्हास्त्र" औषध तयार करून फवारणी करावी.यासाठी एक एक्कर फवारणीसाठी एका भांड्यात दहा लिटर गाईचे गोमुञ, कडू लिंबाचा वोला पाला पाच किलो, हिरवी मिरची आर्धा किलो, लसुण पाव किलो, गावरान तंबाखू आर्धा किलो, करंजी झाडाचा 2 किलो ताजा पाला, सीताफळ झाडाचा वोला पाला 2 किलो, एरंड झाडाचा वोला पाला, धोतरा झाडाचा 2 किलो वोला पाला, कॉंग्रेस झाडाचा 1 किलो पाला हे सर्व एकञीत करून अग्नीवर उकळावे व उकळलेले मिश्रण 48तास थंड होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेले मिश्रण प्रत्येकी एक पंपासाठी पाण्यात 1 लिटर टाकून फवारणी करावी. यामुळे शेतक-याना अल्पदरामध्ये सेंद्रिय पद्धतीने औषध तयार करता येते तसेच या औषधामुळे विषमुक्त अन्न पिकते अशी माहिती स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या कृषी संवाद सहाय्यक जयश्री माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.