उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जनता दलाचे (से.) प्रदेश युवा उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय परिषद सदस्य अॅड कुलदीपसिंह भोसले यांनी शनिवार दि.18 रोजी परंडा येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पक्षात प्रवेश देण्यात आला. अॅड. भोसले यांची भारत सरकारच्या वतीने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जागतिक युवा परिषदेसाठी  निवड झाली होती.  त्यात त्यांनी युवकांच्या प्रश्नावर भक्कम बाजू मांडली.  त्यानंतर त्यांनी ७ राष्ट्रांचा दौरा केला. ते उत्तक संघठक, उच्चशिक्षीत व फर्डे वक्ते आहेत. पक्षप्रवेश कार्यक्रमास दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, खंडेराव चौरे, सतिश देशमुख, संताजी चालुक्य, राजसिंह पांडे आदींची उपस्थिती होती.

 
Top