उस्मानाबाद /प्रतिनिधी-
आश्रम शाळा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू आहे. याचा मंगळवारी पाचवा दिवस होता. तरीही त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली आहे.
राज्यातील आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगापासून वेतन अदा केले जात नाही. भेदभावाच्या अडवणुकीचे व दप्तर दिरंगाईचा कार्यपद्धतीमुळे राज्यातील सर्व आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे, असे नमुद करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने शुक्रवारपासून शिक्षकांचे साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये उपोषणकर्ते सतीश कुंभार, हरीभाऊ बनसोडे, काका कांबळे, दादा माळाळे, राहुल राऊत व अन्य पदाधिका-यांनी सहभाग घेतला. 
 
Top