उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर नरेंद्र मोदी यांची तुलना करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपच्या भगवान गोयल याच्या प्रतिमेला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रतापसिंह पाटील, जिप सदस्य मेहेंद्र धुरगडे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शंतनु खंदारे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तारेख मिर्झा, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष सुशील शेळके, तुषार वाघमारे, प्रशांत लोमटे, आदीत्य गोरे, विशाल पाटील, बालाजी भातलवंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top