रुईभर /प्रतिनिधी - रुईभर ता.उस्मानाबाद येथील रहिवासी सौ धोंडाबाई दत्तात्रय बनसोडे (वय48) यांचे शनिवार (दि18)रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले धोंडाबाई बनसोडे यांना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामुळे त्यांना तात्काळ उस्मानाबाद येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा कोळगे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ, नातेवाईक, आप्तेष्ट,गावातील प्रतिष्ठित यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयातील वरिष्ठ लिपिक दत्तात्रय देविदास बनसोडे यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे त्यांच्या अकाली निधनाने रुईभर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे
 
Top