उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोयाबीनचा पीकविमा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, खरीपात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड झाले होते. शेतकऱ्यांना विहित पद्धतीने पीक पंचनामे करण्याबाबत जाहीर आवाहन केले होते. पीक कापणी प्रयोगावेळी देखील प्रयोग वस्तुनिष्ठ होण्यासाठी दक्षतेची विनंती केली होती. ज्यांनी पीक पंचनामे व पीक कापणी प्रयोगावेळी खबरदारी घेतली अशा शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल याबाबत शंका नाही. पीकविम्याची केंद्र व राज्याच्या हिश्श्याची रक्कम मार्च महिन्यात मिळते. परंतु, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने दिलासा मिळण्यासाठी रक्कम तातडीने जमा होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांनी पीक पंचनामे करताना विहित पद्धतीचा अवलंब केला नाही त्यांनाही मदतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. खरीप पीक विम्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अद्याप माहिती दिली नाही.याबाबत पाठपुरावा सूर असून येत्या 15 दिवसात सदर माहिती केंद्र सरकारला मिळणार असून फेब्रुवारी महिन्यातच केंद सरकारचे हिश्श्याचे पैसे जमा होतील. राज्यपालांची मदत जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने नियोजन समिती बैठकीत निदर्शनास आणली.पालकमंत्री शंकरराव गडाख यांना याबाबत लक्ष घालून चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत मागणी केली. त्यावर पालकमंत्री गडाख यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना सदर मदत मिळवुन देण्याचे आश्वस्त केले.
 
Top