उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ढोकी व येरमाळा, कळंब पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून संबंधित पोलिस ठाण्याकडे सूपूर्द केले.
 कळंब पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कालिदास रामा शिंदे (रा. दत्त नगर पिढी, ढोकी) हा तर हेमंत नाना काळे (रा.लक्ष्मी पेढी तेरखेडा) हा येरमाळा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देत होते. दरम्यान, त्यांची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच पथकाने पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन, अतिरिक्त अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक डी.एम.शेख, सपोनि खांडेकर, सहाय्यक फौजदार घायाळ, कर्मचारी झोंबाडे, माळी, कवडे, वाघमारे, सर्जे आदींनी या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. 
 
Top