तेर/प्रतिनिधी-
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या  जयंतीनिमित्त तेर ता उस्मानाबाद येथील  महाराष्ट्र संत विद्यालयात दि. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर सप्ताह सोहळयास   मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी सरपंच नवनाथ नाईकवाडी , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राहुल भोरे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू मोमीन , सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर , मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , शाहबाझ मुलांनी आदिंसह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.,
 यावेळी मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , एम .एन .भंडारे  , डी  डी .राऊत  , आर .एम .देवकते  , एम. एन .शितोळे , ए .एन. रणदिवे  , एस .यू .गोडगे ,  ए .डी .राठोड , हरी खोटे , एम. एन. नंरसिगे , ए बी.नितळीकर , एस. डी घाडगे , महंमद बागवान , सतिश भालेराव , ज्ञानेश्वर काळे , एस .आर .पाटील , एस .एस .सामटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता महामुनी, वैष्णवी आंधळे यानी तर आभार प्रदर्शन नाईक मधूसूदन यांने मानले.

 
Top