लोहारा/प्रतिनिधी-
ग्रामविकास अधिकारी संजय कारभारी यांची उस्मानाबाद जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायत भोसगा व साई ग्रुप व ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
 यावेळी राजाराम दासिमे, ग्रा.पं.सदस्य मुकेश सोनकांबळे, ग्रा.पं.सदस्य माणिक बिराजदार, भाजपा माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, साई ग्रुपचे अध्यक्ष प्रसन्न एकुंडे, भिमाशंकर थाटे, रेवणसिद्ध काटगावे, राजेंद्र जळकोटे, अप्पाराव पाटील, व्यंकट कागे, संतोष जाती, महेश मानाळे, खंडु थाटे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संजय कारभारी यांनी यापूर्वी ग्रामसेवक संघटना तुळजापूर  तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

 
Top