परंडा /प्रतिनिधी-
 शेतक-यांच्या  धान्य उत्पदनात वाढ व्हावी या उद्देशाने  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत सन 2019 - 20 रब्बी हंगामा साठी वाटप करण्या साठी आलेले हरभरा बियाने वाटपात परंडा  कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी गैरकारभार केला असुन या प्रकरणी सबंधीतावर वरिष्ठ अधिका-यांनी सखोल चौकशी करून  कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत  परंडा तालुक्यासाठी 16 टन 5  क्विंटल हरभरा प्राप्त झाला होता. त्या पैकी निवड केलेल्या अनाळा मंडळातील 8 गावातील 25 शेतक-यांना सन 2019 - 20 या रब्बी हंगामा साठी 6 टन हरभरा बियाने मोफत वाटप साठी प्राप्त झाला होता निवड केलेल्या  एका शेतक-याला 30 कीलो बियाने वाटप करण्याचे आदेश असताना कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांनी  अनाळा मंडळातील गोसावीवाडी येथिल शेतक-यांना नियमा नुसार बियानाचे वाटप न करता शेतक-्यांना केवळ 5 किलो बियाने वाटप करून 25 कीलो  बियाने वाटप केल्याची बोगस यादी कार्यालयात सादर केली या प्रकरणाला कार्यालयातील आधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असुन या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन अनाळा मंडळ मधील बियाने वाटपाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचा-यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 
Top