उमरगा/प्रतिनिधी
 उमरगा तालुका शांतीदुत परिवाराच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उमरगा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 101 रक्तदात्यानी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला । रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले , पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले , श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉ. दामोदर पतंगे , महावीर कोराळे, प्रा. जीवन जाधव, बाबूराव शहापुरे, कैलाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रास्ताविक प्रा. अभयकुमार हिरास यानी केले. या रक्तदान शिबिरासाठी शांतीदूत परिवाराचे उमरगा तालुकाधक्ष प्रा.जीवन जाधव यानी विशेष पुढाकार घेतला होता.
 
Top