उमरगा/प्रतिनिधी-
शहरातील विविध मागण्यांसाठी सोमवारी दि.21 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर माजी नगरसेवक व आरटीआय कार्यकर्त्याच्या वतीने धरणे आंदोलन व हलगीनाद आंदोलन सुरू करण्यात आले.
माजी नगरसेवक दत्तू रोंगे व आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र उबाळे यांनी शहरातील विविध मागन्यासाठी  उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे व हलगी नाद आंदोलन सुरू केले असून यासदर्भात त्यांनी 27 तारखेला निवेदन दिले होते.निवेदनात म्हटले आहे की,उमरगा पालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून स्पेशल ऑडिट करण्यात यावे,न.प.कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची सखोल चौकशी करण्यात यावी,2018-19 न प उमरगा यांनी एक कोटी 9 लाख 21 हजार 658 रुपयांची बेकायदेशीर गौंणखनिजाची विल्हेवाट लावली याची सखोल चौकशी व्हावी,उमरगा पालिकेत 95 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस येऊनही गुन्हे अन्वेषण तपास शाखा उस्मानाबाद हे तपास करण्यात अपयशी ठरले असून सदर प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत व्हावा,न प हद्दीतील पतंगे रोड या कामाची चौकशी होबून रस्ते कामास तात्काळ सुरुवात करावी,शहरातील विविध भागात महिला व पुरुषासाठी मुतारीची व्यवस्था तात्काळ करावी,उमरगा पालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे निविदा व ई निविदा ठराविक कोड टाकून काढतात.तसे न करता राज्यस्तरीय दैनिकात निविदा प्रकाशित कराव्यात जेणेकरून चांगल्या ठेकेदार उपलब्ध होतील व दर्जेदार विकासकामे होतील,उमरगा पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत गेल्या तीन वर्षांत झालेल्या खर्चाची सखोल चौकशी व्हावी,शहरातील घनकचरा व स्वछता करण्यासाठी नियमबाह्य रीतीने तीन वर्षासाठी दिलेल्या ठेक्याची चौकशी व्हावी,दलित स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असतानाही स्मशानभूमीसाठी सुशोभिनिकरण करीत आलेला निधी शासनाची दिशाभूल करून इतरत्र ठिकाणी वळविण्यात अली याची चौकशी करण्यात यावी.या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.

 
Top