तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी तुळजापूर येथील पंचायत समिती मध्ये रविवार दि.5 रोजी झालेल्या बैठकीत बिनविरोध  निवड झाली.
ग्रामसेवक संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष भारत सोनवणे,मावळते सचिव देवीदास चव्हाण, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष महादेव तुकाराम जगताप, उपाध्यक्ष   आगरकर एस. के. उपाध्यक्ष मुकुंद पांडुरंग देशमुख, सरचिटणीस एस. ए. घोगरे, सहसचिव सुद्रीक एस. डी., जिल्हा संघटक शशीकांत रामलिंग पवार आदी नुतन पदाधिकारीचा विभागीय अध्यक्ष देविदास चव्हाण यांनी सत्कार केला.
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ व सहाय्यक निवडणूक आधिकारी म्हणून साहेबलाल तांबोळी यांनी काम पाहिले.

 
Top