उस्मानाबाद/प्रतिनिधी-
  भूम-परांडा  व कळंब  पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आ. प्रा. तानाजी सावंत , खा.ओमराजे निंबाळकर , आ.कैलास पाटील यांनी राहूल मोटे व आ.राणाजगजितसिंह पाटील गटाचे सदस्य पळवत तिन्ही ठिकाणी आपले सभापती केले.   त्यामुळे भाजपावाशी झालेले आ.राणाजगजितसिंह पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहुल मोटे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकारणातील हा हिशोब चुकता करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी मोटे गटाचे ६ जि.प.अध्यक्ष व आ.राणापाटील गटाचे आणि शिवसेनेचे बंडखोर असलेले कांही जि.प.सदस्य सहलीवर गेले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्व जिल्हयात अंधारात असल्याचे दिसुन येते.
मोटे गटाचे सदस्य राणाजगजितसिंह यांच्या सदस्यांबरोबरच सहलीला गेल्यामुळे उस्मानाबादेत महाविकास आघाडीचा प्रयोग फसण्याची चिन्ह आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सरसी होणार आहे.अशा प्रकारची अप्रत्यक्ष कबुली जि.प.उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.हिरकणी महोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दही-धपाट्याचा अस्वाद पत्रकारासोबत घेताना त्यांनी आगामी काळात ही जिल्हा परिषद मध्ये आमची सत्ता राहणार आहे. पं.स.निवडणुकीत आपली ताकद दाखविणारे आता कुठे पळून गेलेत असा प्रकारचा टोला लगावला.

 
Top