तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर नगरपरिषद चे प्रभारी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष बापुसाहेब कणे यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा  सोमवार दि.27 रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
उपनगराध्यक्ष यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष यांना द्यावा लागतो, परंतु येथे उपनगराध्यक्षच प्रभारी नगराध्यक्ष असल्याने उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा कुणाकडे द्यायाचा? तो कोणी स्विकारायाचा कुणी असा पेच प्रशासना समोर उभा टाकल्याने या राजीनामा बाबतीत प्रशासन काय निर्णय घेणार या कडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर नगरपरिषद नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे यांच्या अपात्रतेचे  प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने  उपनगराध्यक्ष श्री   कणे प्रभारी  नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहत आहेत. मात्र गंगणे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा की, देवु नये,  या बाबतीत प्रचंड खलबत झाले. आ. राणाजगजितसिंह पाटील व विनोद गंगणे यांच्याशी  चर्चा केल्यानंतर कणे यांनी  उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर झाल्यास नगराध्यक्ष पद ही संपुष्टात येणार असल्याने आता काही कालावधी करीता प्रशासक येण्याची शक्यता आहे.

 
Top