तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंनी मराठवाडास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी कै. भानुदास जयवंतराव धुरगुडे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे इयत्ता आठवी ते दहावीतील मुला मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडास्तरीय मैदानी स्पर्धेत तेर (ता. उस्मानाबाद) येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडू राधा गोरे हीने गोळा फेक स्पर्धेत द्वितीय तर प्रणिता जाधव हीने 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रक्रमांक पटकाऊन  उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रक्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
 
Top