उस्मानाबाद/प्रतिनिधी- दि.2 जानेवारी ते 8 जानेवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणा-या पोलीस रेझींग डे निमित्ताने पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे औचित्य साधून आज दि.3 जानेवारी 2020 रोजी रेझींग डे व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महिला व बालकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हयातील शाळा/कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रतिष्ठित नागरिक तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे नागरिकांचा रॅलीत मोठया प्रमाणावर सहभाग होता.
रॅलीची सुरूवात पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथून पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली तर रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे करण्यात आला.
पोलीस मुख्यालय येथे रेझींग डे निमित्ताने पथनाटय, महिला व मुलींकरिता आत्मसंरक्षणपर प्रात्यक्षिके, देखावे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर रेझींग डे च्या निमित्ताने पोलीस निरीक्षक संजय बाबर यांनी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्र.पोलीस उप अधीक्षक श्री.गजानन घाडगे यांनी केले तसेच सावित्रीबाई फुले, जयंतीनिमित्ताने महिला व बालकांना त्यांच्यावर होणा-या सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत जागृती तसेच त्यांना असलेले कायद्याचे संरक्षण या विषयांबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्री.सचिन पंडित यांनी प्रबोधन केले.
याप्रसंगी उपस्थित विद्याथ्र्यांना पोलीस विभागाकडे असणारा दारूगोळा, विविध हत्यारे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्हयातील हरविलेल्या व्यक्तींबाबतच्या माहितीचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणावरून हरविलेल्या मोबाईलचा सायबर सेल मार्फत शोध घेवून संबंधितांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड तसेच पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा श्री. डी.एम.शेख, रापोनि शांताराम वाघमोडे तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,नगरसेवक, विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.