उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्याथ्र्यांंनी नृत्य, संगीताच्या माध्यमातून बहारदार कलागुणांचे दर्शन घडविले. बेंबळी येथील बोंदर विद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या संमेलनास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्री सरस्वती देवीच्या प्रतिमा पुजनाने सोहळ्यात करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर बोंदर तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, सरपंच सत्तार शेख, बालाजी भोसले, गोविंद शिडुळे, मुख्याध्यापिका सुवर्णा फुलारी आदींची मंचावर उपस्थिती होती. गणेश जयंतीदिनी संमेलन असल्याने सुरुवात श्री गणरायाच्या बहारदार गीताने करण्यात आली. हिंदी, मराठी गीतांवर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अतिशय सुरेख असे नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. संमेलनात 325 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री बोंदर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिक फुलारी यांनी व्यक्त केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी मुकूंद माने, अनिल राठोड, ज्ञानेश्वर मुंडे, ज्ञानेश्वर ढोरमारे, भाग्यश्री खापरे, अनुराधा चादरे, अंजुश्री मुदगुडकर, सुदर्शना जोडबोटे, सोनाली सुरवसे, स्नेहा सूर्यवंशी, सोनाली दाणे, उषा गाडे आदी शिक्षक, कर्मचारी, विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. संमेलनास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 
Top