उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना मनातील नैराश्य काढून टाकणे गरजेचे आहे.शिक्षण घेतांना आपले ध्येय पक्के करावे व मोठ्या पदावर पोहचायचे असेल तर आत्मविश्वासाने अभ्यास करावा स्पर्धा परिक्षेसाठी व्यवस्थित नियोजन करून आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास आपले ध्येय गाठता येथे यासाठी विद्याथ्र्यांनी प्रचंड अभ्यास करावा व आपले बोलणे जर प्रभावी असेल तर नेतृत्वाची नक्किच संधी मिळते, असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा पोलिस प्रमुख राजतिलक रोशन यांनी केले.
आमदार सतिश चव्हाण यांच्या भानुदास चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतिने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाड्याचा युवा वक्ता आंतरमहाविद्यालयीन उस्मानाबाद जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन करतांना दि.6 जानेवारी रोजी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते.प्रमुख पाहुणे म्हणून नितिन तावडे (स्वागताध्यक्ष अ.भा.म.सा.सं.उस्मानाबाद), रोहित बागल,प्रा.राजा जगताप,आबदाने सर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमाचे पूजन केले.प्रास्ताविक रोहित बागल यांनी केले.
पुढे बोलतांना राजतिलक रोषन म्हणाले की,स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना मोजकेच पण नियोजन करून वाचन करावे नियोजनामुळेच आपले ध्येय गाटता येते. नितिन तावडे म्हणाले की,वक्तृत्व कलेमुळे आपणास नेतृत्व करण्याची संधी मिळते म्हणून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक वक्तृत्ववान माणसे जन्मली त्यांनी वक्तृत्वाच्या बळावर खुप मोठी झाली त्यामध्ये प्रमोद महाजन, विलासरावजी देशमुख ही माणसं मराठवाड्यातील वक्तृत्वाच्या बळावरच मोठी झाली.
सूञसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले या स्पर्धेला उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध विद्यार्थी —विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला .परीक्षक म्हणून प्रशांत गुरव,दास पाटील यांनी काम पाहिले.