उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे 1 जानेवारी पासून ग्रामस्वच्छता आणि जलसंवर्धन या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरास प्रारंभ झाला आहे . विद्याथ्र्यांच्या वतीने या गावातील शाळा , सार्वजनिक रस्ते आदी विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती , जलसंवर्धनाच्या विविध कामे मार्गी लावली आहेत .विद्याथ्र्यांच्या श्रमदानातून या गावात सुरू असलेल्या ग्रामस्वच्छतेच्या विविध कामामुळे या गावाचा कायापालट झाला असून जकेकुरवाडी गावात युवकांच्या श्रमदानाने ग्रामस्वच्छतेचा जागर सुरू आहे.
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधी दरम्यान ग्रामस्वच्छता व जलसंवर्धन हे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न होत आहे. शिबिर कालावधी दरम्यान कृषी, अरोग्य , साहित्य , कला , क्रीडा , शिक्षण , अध्यात्म या विविध विषयावर विद्याथ्र्यांचे बौद्धीक प्रबोधन केले जात आहे. प्राचार्य डॉ. दिलीप गरूड , उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बालाजी मोरे , प्रा.डॉ. उदय दिंडोरे यांच्या प्रेरणेने जकेकुरवाडी गावात विद्याथ्र्यांंच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छतेचा जागर सुरू आहे .
श्रमदाना करीता विद्याथ्र्यांंचे स्वतंत्र गट स्थापन करण्यात आले आहेत . संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता गट , श्री छत्रपती शिवाजी राजे जलसंवर्धन गट , संत तुकडोजी महाराज गट , महात्मा बसवेश्वर स्वच्छता गट या गटांमार्फत शिबिरार्थी विद्याथ्र्यांना ग्रामस्वच्छतेच्या व जलसंवर्धनाच्या कामाचे विभाजन करून देण्यात आले आहे . प्रत्येक विद्यार्थी स्वयंस्फूर्तिने दररोज चार ते पाच तास श्रमदान करून ग्रामस्वच्छतेची विविध कामे मार्गी लावत आहेत .
गेल्या चार दिवसाच्या कालावधी दरम्यान गावातीत अंतर्गत सस्त्यांची दुरुस्ती , जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता , श्री छत्रपती शिवाजी चौक परिसराची स्वच्छता , नूतन वसाहतीच्या रस्त्यांची दुरुस्ती इत्यादी ग्रामस्वच्छतेच्या कामातून विद्याथ्र्यांनी या गावात आपल्या श्रमदानातून गावाचा कायापालट करून या गावाला ग्रामस्वच्छतेचे व जलसंवर्धनाचे महत्व पटवून दिले जात आहे. पाणी हे जीवन आहे , पाण्याचा वापर काटकसरीने करा , जल है तो कल है , पाणी वाचवा देश घडवा असा प्रबोधनाचा संदेश घरोघरी जाऊन दिला जात आहे . या गावातील ग्रामस्थाना जलसंवर्धनाचे व ग्रामस्वच्छतेचे महत्व पटल्याने घराघरात व शिवारा -शिवारात आता पाण्याचा काटकसरीने वापर सुरू झाला आहे .
शिबिर कालावधी दरम्यान विद्याथ्र्यांच्या कला गुणाना वाव मिळावा, विद्याथ्र्यांचे बौद्धीक प्रबोधन व्हावे या साठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . कवी संमेलन , पथनाट्य , कथाकथन , एकांकी , लोकगीत गायन , सुगम गायन , चारोळी , प्रेमगीत गीत गायन या विविध कला अविष्काराने संपुर्ण जकेकुर गावात ग्रामस्वच्छते बरोबरच मनोरंजनाचा व बौद्धीक प्रबोधनाचा जागर सुरू झाला आहे . जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक आशोक गर्जे , सरपंच शांताबाई पवार , ग्रामसेवक आंबादास चव्हाण , सुनिल औरोदे , दिलीप जगताप , प्रा. रविंद्र जोजन , प्रा. संतोष होगाडे , प्रा. मंगेश बनसोडे , प्रा.डॉ. फुलचंद पवार प्रा. सतीश गायकवाड सह ग्रामस्थ शिबिराच्या यशस्वीते साठी विशेष परिश्रम घेत आहेत . ग्रामस्थ राचप्पा जोजन यांच्या वतीने शिबिरार्थीना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे .विद्याथ्र्यांच्या श्रमदानातून या गावात ग्रामविकासाची चळवळ गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.