
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पत्रकार हरी खोटे यांना उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन 2019 चे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. यात उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पत्रकार हरी खोटे यांच्या " शासकीय मदती विना नुकसानग्रस्त शेतक-यांनी धरली चाढ्यावर मुठ ! " या वृत्तास उत्कृष्ट वार्ता गटांतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै .महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मराठवाडास्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून 5 हजार रुपये सन्माचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.