लोहारा/प्रतिनिधी-
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्स उस्मानाबादच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयातील पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, मधूमेह, रक्तदाब, नेत्र, अस्थीरोग अशा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, व डी.वाय, एस.पी.मोतीराम राठोड आपले विचार व्यक्त केले.  या शिबीरास   सह्याद्री चे संचालक डॉ.दापके - देशमुख दिग्गज,डॉ. कृष्णा उंदरे - देशमुख, डॉ रमेश जावळे, डॉ. वसुधा दापके - देशमुख, डॉ.शैलजा  मिटकरी, डॉ.प्रिया बाराते डॉ.महेश पाटील, डॉ.सरडे, डॉ किशोर काकडे, डॉ.सतीश गवाड, डॉ महादेव, बालाजी कानवटे, हर्षद दापके -देशमुख, शिवाजी जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top