लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जि.प.शाळेत बालआनंद मेळावा (बाजार) मोठ्या उत्साहात संपन्र झाला. यावेळी सर्व विद्याथ्र्यांनी विविध स्टॉल मोठ्या प्रमाणात लावुन साहित्याची विक्री केली.
या बाल आनंद मेळाव्यातुन विद्याथ्र्यांना व्यवहारीक ज्ञानाबरोबरच नफा तोटा, खरेदी विक्री, भाषा कौषल्य याचे ज्ञान मिळाले. यावेळी शाळेतील शिक्षक दत्ताञय पांचाळ, तानाजी दबडे, मधुकर शिंदे, शंकर काळे, यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बाल आनंद मेळाव्यात गावातील नागरीकांनी सहभाग नोंदवुन खरेदी करुन समाधान व्यक्त केले.
 
Top