उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आजपर्यंत मार्क जास्त मिळविणे, घोकपपट्टी करणे, नौकरी मिळविणे अशा प्रकारची शिक्षण पध्दत होती, त्यामुळे मुलांना योग्य वयात योग्य संस्कार दिले गेले नाहीत, त्यामुळेच सध्या समाजाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वत्र वाढत असलेले खून, खंडणी प्रकरण, बलात्कार हे टाळण्यासाठी  लहान वयातच विद्याथ्र्यांना मुल्यवर्धन शिक्षण देण्याची गरज आहे, असे मत शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे प्रमुख शांतीलाल मुथ्था यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
देशात घडलेले निर्भया प्रकरण असो अथवा मित्रांनी मित्राचा खंडणीसाठी केलेला खून असो, हे सर्व मुलांना चांगले संस्कार देणे आवश्यक असताना ते दिले गेले नाहीत, हे संस्कार देताना जात,पात, धर्म शहरी अथवा ग्रामीण असा भेदभाव न करता सर्व लहान मुलांना मुल्यवर्धन शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्या तीन वर्ष वयाच्या लहान मुलाला शाळेत प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागते, त्यासोबतच डोनेशन ही द्यावे लागते, त्यामुळे शिक्षण हे गुंतागुतीचे झाले आहे. काळानुसार नवा अभ्यासक्रम येणे आवश्यक असताना देखील अभ्यासक्रम बदलला गेला नाही, त्यामुळे भितीमुक्त वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्य घटनेतील सर्व तत्वमुल्य रूजविणे आवश्यक आहे.मुले दुस-याचे अनुकरण करीत असतात त्यामुळे मुल्यवर्धन शिक्षण आवश्यक आहे. बीड जिल्हयात याचा गेल्या ६ वर्षांपासून प्रयोग केला आहे. चांगला रिजल्ट आल्यामुळे राज्यातील ३४ जिल्हयात ६७ हजार शाळेत मुल्यवर्धन शिक्षण चालू केले आहे.यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आमच्या फाऊंडेशनकडे आहे.सध्या मुल्यवर्धन शिक्षणाकडे कार्यक्रम म्हणुन नव्हे तर एक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सध्या ही चळवळ गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यात चालु असून तेलंगणा सरकार ने ही आपल्या राज्यात ही चळवळ चालविण्यासाठी आमंत्रित केले असत्याचे मुथ्था यांनी सांगितले.
यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, डायट प्रा.नदाफ, विजयकुमार बेदमुथा, कांचनमाला संगवे, सुनिल डुंगरवाल आदीं उपस्थित होते.

 
Top