उस्मानाबाद/प्रतिनिधी-
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय लोकांना दुर ठेवले होते, त्यावर प्रतिक्रिया म्हणून नाही तर नव्याने राजकारणात येणारी नवी पिढी आदर्शवत बनावी, यासाठी राजकीय साहित्य संमेलन घेणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी बैठकीत बोलताना दिली.
शनिवार दि.१८ जानेवारी रोजी सर्कीट हाऊस येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, गटनेता युवराज नळे, न.प.उपनगराध्यक्ष अभय इंगळे, परंड्याचे जाकीर सौदागर, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नितीन तावडे, अग्निवेश शिंदे, अॅड.नितीन भोसले, खलिल सय्यद सर, मधुकर मुळे, ,  यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी धनंजय रणदिवे, महेश पोतदार, मुळे, सय्यद, भोसले, शिंदे , यांनी ही या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्रावर चर्चा केली. बैठकीत शहरात १५ दिवसाला पाणी येते वगैरे शहरातील समस्या कांही लोकांनी उपस्थित केल्यानंतर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी ९३ व्या साहित्य संमेलनात मदत घेताना काय नियमित पाणी येत होते का ? असा प्रश्र उपस्थित करून राजकीय साहित्य संमेलनात, असे कांही प्रश्र समोर येथील हे मला माहित आहेत, परंतू मी त्यासाठी खंबीर असल्याचे सांगिले.
द्वेष करू नका-तावडे
बैठकीत नितीन तावडे यांनी नव्याने राजकीय साहित्य संमेलन घ्यायचे असेल तर घ्या, पण आम्ही घेतलेल्या साहित्य संमेलनाचा द्वेष म्हणून हे संमेलन घेऊ नका, उस्मानाबादेत संपन्न झालेल्या ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडल्याचे कौतुक देशभरातून होत आहे. त्यामुळे तुम्ही द्वेष करू नका  जिल्हयातील दुष्काळी स्थितीचे चर्चा साहित्य संमेलनात झाली आहे. आयोजकांच्या भूमिकेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण घेणा-या राजकीय साहित्य संमेलनास शूभेच्छा राहिल असे सांगितले.
द्वेष नव्हे तर व्यक्त होण्यासाठी-आ.घाडगे पाटील 
संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका मला देखील मिळालेली नाही, त्यामुळे द्वेष म्हणून नाही तर राजकीय लोकांत अनेक साहित्यीक असतात, अशा लोकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याची संधी राजकीय साहित्य संमेलनातून मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेचे आ.कैलास घाडगे पाटील यंानी व्यक्त केली.
संस्कारी राजकीय पिढी होण्यासाठी- अस्मिता कांबळे 
जिल्हा परिषद उस्मानाबादच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यंानी मान-आपमान झाला म्हणून राजकीय संमेलन घ्यायचे नाही तर राजकारणातील वारसदारांच्या संस्कारीत वाटचालीसाठी राजकीय साहित्य संमेलन आवश्यक आहे, असे सांगून जून्या काळात राजकारणातील थोर व्यक्ती साहित्यीक म्हणून गाजले. राजकारणात ही चांगले साहित्यीक असतात हे दाखविण्यासाठी राजकीय साहित्य संमेलन आवश्क आहे.
 
Top