उस्मानाबाद/प्रतिनिधी- राजस्थानी समाजाच्या वतीने प्रदेश माहेश्वरीच्या अध्यक्षपदी श्रीकिसन भन्साळी व सचिव मदनलाल मिणियार यांची निवड झाल्यानंतर त्यांचा अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष शामसुंदर सोनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय मालपाणी, आशोक बांग, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, संजय म्हाड, सत्यनारायण लाहोटी, गिरधारी चांडक , अशोक शर्मा आदींची उपस्थिती होती.