वाशी/प्रतिनिधी-
अजिंक्य विद्यामंदिर वाशी येथे दि. 23 जानेवारी रोजी बालआनंदनगरी मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे दादासाहेब चेडे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊट-गाईड पुरस्कार विजेत्या शिक्षिका श्रीम. जगताप एस.ए. या होत्या. याप्रसंगी माता-पालक संघाच्या अध्यक्षा आश्लेषा कवडे व पदाधिकारी शामल कवडे व जयश्री आगाशे यांची उपस्थिती होती.
विद्याथ्र्यांना व्यवहारज्ञान प्रत्यक्षपणे समजावे या उद्देशाने बाल-आनंदबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील सर्व विद्याथ्र्यांनी विविध खाद्यपदार्थ तसेच भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी ठेवले होते. यातून सर्व विद्याथ्र्यांचा एकंदरीत चाळीस हजार रु. व्यवहार पालक व इतर विद्याथ्र्यामार्फत झाला. या उपक्रमाचा लाभ शाळेतील एकूण सातशे विद्यार्थी व दोन हजारांपेक्षा अधिक पालकांनी घेतला. तसेच कार्यक्रमात सहभागी असणा-या माता-पालकांसाठी संगीत-खुर्चीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व पालकांनी व शाळेचे संस्थापक श्री. एस.एल. पवार सरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मु.अ. श्री. एल.एस. पवार व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top