उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे व माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधु अमरसिंह बाजीराव पाटील (५०) यांचे अल्प अजाराने पुणे येथे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर तालुक्यातील तेर येथील पाटील मळ्यात  आर्य समाज पध््दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ, बहिण, पुतणे असा मोठा परिवार आहे.
यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, आ.कैलास पाटील, जीवन गोरे, अरविंद गोरे, जनता बॅंकचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी आदी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ.सुनित्रा पवार, माजी आ. राहुल मोटे, पार्थ पवार, डॉ.पद्मसिंह पाटील, अजित बाबा पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील, सौ.अर्चनाताई पाटील आदी पाटील परिवारातील सर्व उपस्थित होते. गेल्या ६ महिन्यापासून अमरसिंह पाटील यांच्यावर पुणे येथे उपचार चालु होते. काल त्यांची अचानक निधन झाले.
 शनिवारी सायंकाळी ५ वाजता तेर येथील संतगोरोबा काका मंदिरा शेजारील पाटील मळ्यात अमरसिंह पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेर व परिसरातील ग्रामीण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top