उस्मानाबाद / प्रतिनिधी:-
दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांसहित अनेक संस्था संघटनांना आमंत्रित केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.जिल्हाधिकारी मँडम होत्या.गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात दिव्यांगानी त्यांच्या संस्था संघटने मार्फत मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात केली होती म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. मात्र या कार्यक्रमात त्यांना साधे विचारले देखील नसुन ही बाब निंदणीय आहे.तसेच सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असतांना या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला. अपंगांना निमंत्रण देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित अधिकारी व इतरावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी मँडम यांना मा.निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की ठराविक वेळेत संबंधितावर कारवाई नकेल्यास राज्यमंत्री आमदार मा.ओमप्रकाश( बच्चुभाऊ) कडु यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करु.. निवेदन प्रहार संघटना, मतदार जनजागरण समिती, राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर ज्ञानेश्वर काकडे, मतदार जनजागरण सचिव अ.लतिफ अ.मजीद,गणेश रानबा वाघमारे,मच्छिंद्र चव्हाण, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदिप डांगे,रियाज पठाण,अन्य इतर उपस्थित होते.
 
Top