उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख सतिश सोमाणी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी शासकीय रुग्णालयाजवळच्या अन्नपुर्णा ग्रुपच्या अन्नछत्र येथे रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.त्यानंतर स्त्री रुग्णालयातील ज्या महिलांनी मुलिंना जन्म दिला आहे अशा सर्व महिलांचा सन्मान करत नविन मुलींना पहिला ड्रेस व टेडी डायपर किटचेही वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,नितीन शेरखाने,युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे,शिवसेना उपतालुकाप्रमुख धनंजय वीर,गोविंद कोळगे,आण्णा पवार,विभागप्रमुख सौदागर जगताप,अनंत भक्ते,अमोल मुळे,दिपक पाटील,आबा सारडे,बापु ढोरमारे,अमोल पाटील,अमिर शेख,आकाश पाटील,आदित्य पांचाळ,प्रविण पाणथरे,सुभाष कळसुळे आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top