
श्री संत मारुती महाराज सोसिअल वेलफिअर फाउंडेशन कानेगाव यांच्यावतीने निराधारांना जीवनाश्यक साम्रगीची मदत करून त्यांना आधार देण्यात आला.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील रहिवासी सुकुमार बाई कांबळे यांच्या पतीचे 10 वर्षापूर्वी निधन झाल. त्या पाठोपाठ 3 वर्षात लगेच मुलगा व सून यांचे ही निधन झाले. त्यामुळे 65 वर्षीय सुकुमार बाई यांच्यावर 2 नातु, 1 नातं यांची जिम्मेदारी पडली. त्यामुळे पोटाची खळगी भरणे शक्य होत नव्हते, त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती. याकडे लक्ष देऊन कानेगाव येथे युवा वर्गांने संत मारुती महाराज सोसिअल वेलफिअर फाउंडेशन ची स्थापना करून या फौंडेशन मार्फत सुकुमार बाई यांना वर्षभर पुरेल असे गहू, तांदूळ, ज्वारी व आवश्यक तो किराणा व त्या लहान मुलांना नवीन कपडे एक छोटीशी मदत रूपात दिली.
यावेळीश् संस्थेचे सदस्य सुधीर चंदनशीवे, दयानंद माटे, सुखराज कदम, सचिन फताटे, पंकज कदम, अंकुश तरमुडे, ज्ञानेश्वर कदम, सतीश कदम (हॅलो मेडिकल फाउंडेशन )महेश कदम, शैलेश चंदनशिवे, बाळासाहेब कदम, बालाजी लोभे, माजी सैनिक गोविंद काटे, मोरे दत्ता, मोरे शाहूराज आदी उपस्थित होते.