उस्मानाबाद/प्रतिनिधी -
जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या सदस्य अॅड. चंदनी विश्वासराव घोगरे-बोधले यांनी नेट परीक्षेत यश संपादन केले आहे. युजीसी नेट अंतर्गत विधि (लॉ) विषयाची डिसेंबर 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल 31 डिसेंबर रोजी जाहीर झाला. ही परीक्षा अॅड. चंदनी घोगरे-बोधले उत्तीर्ण झाल्या आहेत. विधी शाखेच्या एलएलबी व एलएलएम ही पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या अॅड. चंदनी घोगरे-बोधले यांनी यापूर्वी  जून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत  यश मिळविलेले आहे. या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. राघवेंद्र सुबराव बोधले  यांच्यासह सर्व विधिज्ञ तसेच विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौधरी, प्राध्यापक तसेच नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

 
Top