उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील आंबेजवळगा गणातील भाजप समर्थक राष्ट्रवादीचे सदस्य मोहन साबळे यांचे अपहरण करून बेदम मारहाण केल्या प्रकरणी माळशिरस (जि. सोलापूर) येथील ११ जणांविरूध््द ३१ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली होती.
कळंब पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीच्या पाश््र्वभूमीवर सदस्य पळवापळीवरून संघर्ष निर्माण झाला होता. हा संघर्ष एवढा विकोपाला की तो ठाण्यापर्यंत जावून  ठेपला. असे असतानाच आता उस्मानाबाद पंचायत समितीच्या आंबेजवळगा पंचायत समितीच्या आंबेजवळगा गणातील मोहन साबळे नामक सदस्याचे अपहरण करून मारहण केल्याची तक्रार उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी दाखल झाली. आपण २८ डिसेंबर रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभ्े असताना हिंमतराव पाटील, आनंद पाटील, प्रतिक पाटील, रविंद्र पाटील, रणवीर पाटील, प्रितम पाटील व अन्य पाच व्यक्ती दोन वाहनातून तेथे आल्या राजकीय वादावरून धक्काबुक्की करून खुनाची धमकी देत २९ डिसेंबर रोजीत हिंमतराव पाटील यांच्या बोरगाव येथील घरात डांबवून ठेवले, अशी फिर्याद मोहन साबळे यसांनी ३१ डिसेंबर रोजी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून उपरोक्त ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
 
Top