वाशी/प्रतिनिधी-येथील संत मिरा पब्लिक स्कूल मध्ये आनंद बाजार साजरा करण्यात आला .त्यामध्ये अनेक विद्याथ्र्यांनी भाग घेतला असून अनेक प्रकारच्या वस्तूंची दुकाने लावण्यात आली होती.लहानपणापासूनच विद्याथ्र्यांंना खरेदी-विक्री व व्यावहारिक ज्ञान अवगत होण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला.
यामध्ये अनेक विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते व या सर्वामुळे कार्यक्रमाला चांगल्याप्रकारे शोभा आली आणि विद्याथ्र्यांना खूपच अनंद वाटला.
या बाजारात खेळणी, खाद्य पदार्थ ,जनरल आणि स्टेशनरी वस्तू भाजीपाला किराना वस्तूचा समावेश होता. मुख्याध्यापिका सोनाल जैन ,सुरवसे सर रणदिवे सर ,ताचतोडे सर तसेच सहशिक्षक किशोर खुटे ,प्रमोद रसाळ,अमृता डोईफोडे ,पल्लवी चेडे ,रोहिणी डोरले ,सोनाली शिंदे ,बोबडे सर,थोरात सर ,डुकरे सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ,बिजली शिंदे ,गपाट नाना,बबन सोन्ने ,बाबुराव शिदे समाधान तावरे यांच्या सह पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.