उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 डॉ. पद्मसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक च्ॉरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र व तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि. 29/12/2019 रोजी, मौजे.चिखली, ता.उस्मानाबाद येथे सकाळी 10:00 ते 5:00 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा व परिसरातील सर्व वयोगटातील 720 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ज्हदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग यासह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला.
या शिबीराचे उदघाटन मौजे.चिखली गावचे सरपंच सौ.कमलबाई राऊत, उपसरपंच मार्तंड भोजने, तेजस सुरवसे, नेताजी चव्हाण, दुष्यांत चोबे, सौदागर गवळी, संजय काळे, बापु जावळे, अघोर रामकृष्ण पंडीतराव, तुळशीदास जाधव,  कर्मचारी व नागरीक उपस्थिती होते.
शिबीरात मुंबईचे डॉक्टर्स डॉ. अजीत निळे, डॉ. संजय देवरुखकर, डॉ.काजल पाटील, डॉ.सिमरन जौन यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी प्रा. आ. उपकेंद्र वौद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल माने तसेच आशा कार्यकर्ते सौ.बालिका जावळे, कल्पना शिंदे, नंदा उंबरे तसेच तेरणा जनसेवा केंदाचे श्री. सुजीत पाटील, अमीन सय्यद, उत्तम शिंदे, संदिप खोचरे, विजय काळे, रवि शिंदे यांनी  परिश्रम घेतले.

 
Top