परंडा /प्रतिनिधी -
परंडा शहरात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि.2) दुपारी 1 वाजता भव्य  रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान रॅलीतील सहभागी नागरिकांनी तहसीलदारांना निवेदना देण्यात आले.
समर्थन रॅलीला शासकीय विश्रामगृह येथून सुरवात झाली होती. रॅली बाजार मैदान ते मंडई पेठ, भवानी शंकर मंदिर, महाराणा प्रतापसिंह चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रॅली तहसील कार्यालयावर धडकली. यावेळी प्रभारी तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकत्व कायद्याबाबत विशाल काशीद म्हणाले की, केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकावर अन्याय होणार नाही, असे सांगितले. यावेळी लक्ष्मण गोरे, सारंग खंडागळे, महावीर तनपुरे, भाजपाचे न.प.गटनेते सुबोधसिंह ठाकुर, तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे, अॅड. गणेश खरसडे, अॅड. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भालचंद्र औसरे, मेजर महावीर तनपुरे, विठ्ठल तिपाले, पोपट गोडगे, राजकुमार पाटील, निशिकांत क्षीरसागर, कांतिलाल पाटील, अजित काकडे, सारंग घोगरे, रामदास गुडे, बाळासाहेब गिरी, महादेव बारसकर, कुणाल जाधव, विठू मदने, राहुल कारकर, जयवंत पाटील, परशुराम कोळी, रामकृष्ण घोडके आदीसह राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
 
Top