उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील बाभळसुर या गावातील प्रत्येक घरा-घराच्या परिसरात केशर आंब्यांची लागवड होऊन गावाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी आदर्श महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राध्यापक डॉ. अच्युत जगताप यानी पुढाकार घेतला आहे. बाभळसुर आणि नारंगवाडीची वाडी या गावात केशर आंब्याची आडीचशे झाडे  त्यांनी भेट दिली आहेत .
तहशिलदार संजय पवार यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात केशर आंबा वृक्षाची लागवड करण्यात येऊन वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला आहे . या वेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव शहापूरे , रणधीर पवार , प्रा. दादा सुर्यवंशी,  यशवंत जाधव,राजेंद्र सुर्यवंशी,दामाजी हांडे , आशोक पाटील , विष्णु सुर्यवंशी , शिवानंद शिवदे- पाटील मुख्याध्यापक  पोतदार , कुलकर्णी , सुतार सह आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती 
 
Top