
देशाच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे विविध प्रश्नावर लेखणीद्वारे आवाज उठविणे सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य तो न्याय देण्याचे काम अखंडपणे पत्रकार करत असतात, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी केले.
परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य शिंदे महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग आणि ब्रॉडकास्टिंग व जनालीझम या विभागाच्या मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपसमयी त्या बोलत होते. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, ब्रॉडकास्टिंग व जर्नालिझम विभागाचे विभाग प्रमुख डॉ.महेशकुमार माने व प्रा.सज्जन यादव प्रा.एस.के.गायकवाड हे उपस्थित होते. प्रांरभी बाळकृष्ण जांभेकर याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यंाना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा सज्जन यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. शहाजी चंदनशिवे व आभार डॉ.महेश कुमार माने यांनी मानले .
कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. विद्याधर नलवडे, प्रा. जगन्नाथ माळी, प्रा. अक्षय घुमरे , प्रा. डॉक्टर बाळासाहेब राऊत यांनी सहकार्य केले.