कळंब/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्यातील खाजगी संस्थेत कार्यरत शिक्षक कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अद्यापर्यंत मिळालेला नाही. उस्मानाबाद येथील वेतन अधीक्षक कार्यालयात चौकशी केली असता सदर हप्त्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील खाजगी संस्थेत कार्यरत शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता संबंधितांना देण्यासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आमदार कैलास पाटील यांनी शिक्षण संचालक पुणे यांना दिले.  
यासंदर्भात  आ. पाटील यांच्याशी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा कळंब  यांच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदार पाटील यांनी शिक्षण संचालक पुणे  यांना हे पत्र दिले आहे. यानंतर म.रा. जु. पेन्शन हक्क संघटन तालुका शाखा कळंब ने  आमदार कैलास पाटील यांचे आभार मानण्यात आले

 
Top