उस्मानाबाद/प्रतिनिधी
अत्याधुनिक यंत्रयुगाच्या जमान्यात उस्मानाबाद येथील सिंडीकेट बॅंक मात्र पुराण्या जमाण्यातच वावरत आहे. सिंडीकेट बॅंकेत अन्य जिल्हयातील चेक जमा करण्यात दिला असता १५ ते २० दिवसानंतर सदर चेक संबंधित व्यक्तींच्या खात्यावर जमा होतो. २०१३ पासून सिंडीकेट बॅंक उस्मानाबाद शहरात सुरू झाली असून या बॅंकेत जानेवारी २०२० पर्यंत केवळ स्कॉनींग मशिन नसल्यामुळे चेक जमा होण्यास उशीर लागत आहे. सिंडीकेट बॅंक ग्राहकांच्या सोई-सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजगी पसरली आहे.
आरबीआयच्या धोरणानुसार  जेवढया राष्ट्रीयकृत बॅंका आहेत, त्या बॅंकेची शाखा प्रत्येक जिल्हयात असणे आवश्यक आहे. या ध्येयधोरणानुसार उस्मानाबाद शहरात अनेक राष्ट्रीयकृत बॅंकेचे शाखा सुरू झाल्या आहेत. २०१३ पासून सिंडीकेट बॅंकेची शाखा सुरू झाली असली तरी बॅंकेने मात्र, ग्राहकांना देण्यात येणा-या सोई-सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. एखाद्या खातेदाराने  जर पुणे-मुंबई अथवा अन्य शहरातील चेक खात्यावर जमा करण्यासाठी दिल्यास सदर चेक जमा होण्यास १५ ते २० दिवस लागतात. या संदर्भात बॅंक व्यवस्थापकाशी चौकशी केली असता, त्यांनी चेक स्कॉन करण्याची स्कॉनींग मशिन नसल्यामुळे चेक पास होण्यासाठी लातूरला पाठवावे लागते.  १० ते १५ दिवसात जेवढे चेक जमा होतात, तेवढे चेक एकत्र करून एकदाच पाठविले जातात, असे सांगितले.
७ जानेवारी रोजी कांही ग्राहकांनी चेक बॅंक खात्यावर पास होण्यासाठी जमा केले आहेत. सदर चेक हे २३ जानेवारी रोजी पाठविणार असल्याचे सिंडीकेट बॅंकेचे व्यवस्थापक यांनी सांगितले. बॅंकेकडून चेक जमा करण्यास विलंब होत असल्यामुळे कांही ग्राहक या संदर्भात ग्राहक मंच मध्ये जाण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली.
चार महिन्यापासुन मांगणी 
उस्मानाबादच्या सिंडीकेट बॅंकेच्या शाखेत चेक स्कॉनपर पाठवावे, अशा प्रकारची मागणी गेल्या ४ महिन्यापासून आपण करीत असून, माझी मागणी पुर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे बॅंक खातेदारांचे चेक त्यांच्यावर खात्यावर जमा होण्यास विलंब लागत आहे. - रविंद्र आखे,व्यवस्थापक सिंडिकेट बॅंक उस्मानाबाद 
 
Top