तुळजापूर /प्रतिनिधी-
 पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्यांचा सहाय्याने तसेच हत्ती, घोडे, उंटासह छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  शिवजयंत  दि.19 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी तुळजापूर शहरात शिवकार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
तीर्थक्षेत्र तुळजापुरात शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा असून गतवर्षीपासून शिवजयंती संपूर्ण शहरात सण-उत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे. यामध्ये डॉल्बी सारख्या दणदणाटाला टाळून महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा, घोडे, उंट, ढोल, हलगी , लेझीम, तुतारी, संबळ, डफ, गज्या ढोल, ताशा, सनई, झांज, डग्गा, दमडी, कुडमुडे या पारंपारिक वाद्य-वृंदासह वाघ्या मुरळी, आराधी मंडळ, भजनी मंडळ, पिंगळा, वासुदेव, पोतराज आदी पारंपरिक लोक कलाकारांचा या शिवजयंती उत्सवात सहभाग असणार आहे. यासाठी तुळजापूर शहरातील कमानवेस भागात बुधवारी (दि. 22) कै. धन्यकुमार काका क्षीरसागर कॉम्प्लेक्स येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि शिवराय यांच्या प्रतिमेच पूजन करून शिवसेवेचा शुभारंभ करत शिवकार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.
 
Top