उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने,  दि 2 जानेवारी रोजी,कठीन असणारे  सूक्ष्म अर्थशास्ञ समजुन घेण्यासाठी रांगोळीच्या आकृत्या विद्याथ्र्यांच्यात स्पर्धा आयोजित करून काडून घेण्यात आल्या व त्यामाध्यमातुन नाविन्यपूर्ण उपक्रमातुन अर्थशास्ञ समजुन दिले.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए. बी. इंदलकर यांनी केले. यावेळी अर्थशास्ञ विभाग प्रमुख डॉ.जीवन पवार,प्रा.मारूती लोंढे उपस्थित होते.या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळ विद्यार्थ्यांचा सराव होतो व त्यांच्यात आत्मविश्वास वाढत जातो  उपक्रमासाठी बीए भाग 1 मधील दहा विद्याथ्र्यांचे गट करण्यात आले होते. त्या गटातील विद्याथ्र्यांंनी रांगोळीतुन आकृत्या साकारून माहिती दिली. यावेळी परीक्षक म्हणून वाणिज्य विभागातील प्रा. सुप्रिया शेटे राज्यशास्त्र विभागातील प्रा. स्वाती बैनवाड व अर्थशास्त्र विषयाच्या प्रा. रेश्मा तांबोळी होत्या.
 हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.प्रास्ताविक डॉ. जीवन पवार यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन प्रा. मारुती अभिमान लोंढे यांनी केले.
 
Top