उस्मानाबाद/प्रतिनिधी-
म.जोतीराव फुले यांनी साविञीबाईंना  शिक्षण दिले त्यांना शिक्षिका केले. साविञीबाईंनी बहुजन मुलींना शिक्षण दिले व त्यांना अनेक बंधनातून मुक्त केले म्हणूनच आज स्ञिया शिकु लागल्या आहेत.त्यावेळच्या अनिष्ठ रूढी,परंपरा त्यांनी नाकारल्या व महीलांना सक्षम करण्यासाठी मेहनत घेतली.आजच्या मुलींनी मोराईलचा अनावश्यक वापर टाळावा व मुक्तपणे स्वतंञ विचाराने जीवन जगावे असे आवाहन केले. आपल्या व्याख्यानात कमलताई नलावडे यांनी केले.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील "महीला सक्षमिकरण विभागातर्फे दि.3 जानेवारी साविञीबाई फुले यांची 189 वी जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने कमलताई नलावडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते. प्रारंभी मान्यवरांनी साविञीबिई फुले. डॉ.बापूजी साळुंखे, संस्थामाता साळुंखे यांच्या प्रतिमाचे पूजन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केला । प्रास्ताविक डॉ.विद्या जयसिंगराव देशमुख यांनी केले. सूञसंचालन अंजली लोमटे या विद्यार्थिनीने केले. आभार सोनाली राऊत या विद्यार्थिनींने मानले. यावेळी कु.अनीशा आगळे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा.सौ.महाडिक, प्रा.सौ.व्ही.के.बाबर, प्रा.सौ.शेटे., प्रा.सौ.डोळे, प्रा.सौ.जाधव, सौ.वाघमारे, सौ.शेलार इ.मॅडम व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top