चिमुकल्यांनी पालकांची मने जिंकली
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील तेरणा प्रायमरी इंग्लिश स्कुलचे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्याथ्र्यांनी विविध कला प्रदर्शन, नृत्य करून पालकांची तसेच शिक्षक, प्रेक्षकांची मने जिंकली
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ए.डी.जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एल.एल पाटील, सचिव अनंतराव उंबरे, उपाध्यक्ष पद्माकर फंड , सहसचिव रत्नदीप वाकुरे, पालक प्रतिनिधी सचिन टापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत गोरोबाकाका व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट खेळाडूंचा प्रमुख पाहुणे व संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पदक देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे प्राचार्य ए.डी.जाधव यांनी सर्व विद्याथ्र्यांना व पालकांना भाषणाच्या माध्यमातून मंत्रमुक्त केले . संस्थेचे अध्यक्ष एल.एल पाटील यांनी शाळेच्या प्रगती विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्याथ्र्यांनी शेतक-यांच्या समस्या समाजातील घडणा-या प्रसंगाचे नाटक व गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला जवळपास दोन हजार पालक उपस्थित होते. प्राचार्य विलास बचाटे यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. शाळेच्या विद्याथ्र्यांनी रचना रोचकरी व सृष्टी झांबरे यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव साळुंके यांनी आभार मानल.े कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top