उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 28 नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. मंगळवारी (दि. 28) नामनिर्देशनपत्र परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात जणांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष तथा विठ्ठलसाई साखर कारखाना अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची चौथ्यांदा बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा राखली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या आर्थिक उन्नतीशी निगडीत असलेल्या मुरूम येथील विठ्ठल-साई साखर कारखान्याची उभारणी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी खडतर परिश्रमातून पूर्ण केली. विठ्ठल मंदिराच्या उजाड माळरानावर साखर कारखाना उभारण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. आजतागायत हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून सहकार क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे राजकारण न येऊ देता मोठ्या कौशल्याने साखर कारखाना सांभाळून तालुक्यातील परिसरातील शेतकरी सभासदांना व ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या उभारणीमुळे मोठा दिलासा मिळाला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कारखान्याच्या निवडणुकीत बसवराज माधवराव पाटील, बापूराव माधवराव पाटील, शरण बसवराज पाटील, माणिकराव हणमंतराव राठोड, विठ्ठलराव प्रल्हादराव पाटील, सुभाष ग्यानबा राजोळे, केशवराव नागनाथ पवार, दिलीप बाबुराव पाटील, शरणप्पा विश्वनाथ पत्रिके, चंद्रकांत रेवनसिद्ध साखरे, संगमेश्वर विश्वनाथ घाळे, राजीव शरणप्पा हेबळे, विठ्ठलराव चंद्रशेखर बदोले, शब्बीर अब्दुलगणी जमादार, रामकृष्णपंत व्यंकटराव खरोसेकर, सादिकसाहेब अब्दुलकादर काझी, शिवलिंग माळी, शिवमूर्ती तम्मना भांडेकर, दत्तू भालेराव, मंगलताई गरड, इरमाबाई शरणय्या स्वामी या संचालकांची बिनविरोध निवड झाली.
 
Top