तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळच्या वतीने शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त शाकंभरी नवराञ सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन याचा शुभारंभ सोमवार दि.6 रोजी होणार आहे.
या  उत्सवाचे उद्घाटन  पोलीस अधीक्षक रोशन  राजतिलक यांच्या हस्ते होणार आहे.  कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी  माजी राज्यमंत्री मधुकरराव चव्हाण असणार आहे.  या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर, प्राचार्य डॉ.जयशिंग देशमुख, तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर सरव्यवस्थापक श्रीमती योगिता कोल्हे, महंत तुकोजीबुवा महाराज, महंत हमरोजी महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
8 जानेवारी रोजी तुळजापूर गौरव पुरस्कार समारंभामध्ये जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्षा सौ. दीपा मुधोळ मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार राणा जगजितसिंहसिंह पाटील तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ,  पारंपारिक गोंधळ, वाघ्या मुरळी नृत्य, लोक नृत्य, कोळी नृत्य, चित्रकला स्पर्धा, नेत्र तपासणी शिबीर, राज्यस्तरीय कवी संमेलन, मान्यवरांचा गौरव सोहळा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्यक्ष् ाविपीन शिंदे , सचिव नागेश साळुंके, संचालक धनंजय लोंढे, सुधीर रोचकरी आदींसह संचालकांनी केले आहे.

 
Top